फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे 30-40 टक्के काढणीपश्चात नुकसान होत आहे.
केद्र शासनाने सन 2005-06 साली राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM) सुरु केलेले आहे.
या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतक-याने उत्पादीत केलेल्या नाशवंत फलोत्पादनाचे नुकसना कमी करुन त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी व मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी टर्मिनल मार्केटची संकल्पना पुढे आलेली आहे.
टर्मिनल मार्केट हे देशातील मोठ्या शहरांजवळ निर्माण करुन असे मार्केटस फलोत्पादन होणा-या भागामधील संकलन केंद्राशी जोडण्याचे नियोजित केलेले आहे.
अशा संकलन केंद्रांमुळे नाशवंत फलोत्पादन संकलीत करुन त्याठिकाणी क्लिनिंग करुन जास्तीत जास्त गार्बेज त्याच ठिकाणी काढून स्वच्छ केलेला माल टर्मिनल मार्केटमध्ये पाठविण्यात येणार आहे.
उत्पादित क्षेत्रातील संकलन केंद्र व टर्मिनल मार्केटस् ही रिफर व्हॅन्सने जोडली जाणार असल्यामुळे काढणीपश्चात नुकसान टाळणे शक्य होणार आहे.
टर्मिनल मार्केटमध्ये आलेले फलोत्पादन प्रिकुलिंग व ग्रेडींग करुन कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक करण्याचे नियोजित आहे.
टर्मिनल मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक लिलावगृहाद्वारे मालाची विक्री होणार आहे. तसेच सदर मार्केटमधून देशांतर्गत विक्री व्यवस्था, फलोत्पादनाच्या प्रक्रियेची व्यवस्था अपेक्षित आहे.
टर्मिनल मार्केटमधून फलोत्पादन निर्यातीस पाठविणेही अपेक्षित आहे.
यासाठी टर्मिनल मार्केटमध्ये प्रशितकरण, शितगॉह, रायपनिंग चेंबर, ग्रेडींग पॅकींग, गोडावून, प्रक्रिया केंद्र , बँक, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रॉनिक लिलावगृह इ. मूलभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.
टर्मिनल मार्केटची उभारणी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या सहभागातून (Public-Private-Partnership) अपेक्षित आहे.
टर्मिनल मार्केट हे हब (Hub) व स्पोक (Speak) संकल्पनेवर आधारित चालविण्यात येणार आहे.
टर्मिनल मार्केटमध्ये 70 टक्के फळे व भाजीपाला, 15 टक्के अन्नधान्य व 15 टक्के पोल्ट्री, मांस, दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी अपेक्षित आहे
टर्मिनल मार्केट संकल्पनेचा उद्देश
फलोत्पादनाच्या विक्रीचे प्रचलित पध्दतीमुळे होणारे नुकसान कमी करणे.
शेतक-यांना थेट बाजारांशी संपर्क प्रस्थापित करुन उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करुन देणे व मध्यस्थांची साखळी कमी करणे.
फलोत्पादन पणन व्यवस्थेत आधुनिक साधनांचा उपयोग करणे व खाजगी गुंतवणूकदारांच्या सहाय्याने शीत साखळी निर्माण करणे.
स्पर्धात्मक निविदांद्वारे निवड केलेल्या खाजगी उद्योजकांकडून टर्मिनल मार्केटची उभारणी BOO (Build Own Operate) पध्दतीने अपेक्षित आहे.
खाजगी उद्योजकांमध्ये व्यक्तिगत उद्योग, शेतकरी उत्पादक, ग्राहकांचा समूह, पार्टनरशीप, प्रोपरायटर फर्म, कंपनी, कृषि पणन मंडळ, कॉर्पोरेशन, सहकारी संस्था इ. चा समावेश आहे.
केंद्र शासनाचा सहभाग
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खाजगी भागीदारास 25 ते 40 टक्के (जास्तीत जास्त रु. 50 कोटी) अनुदान मागणी करता येते अशी तरतुद आहे.
राज्य शासनाची भुमिका
टर्मिनल मार्केटसाठी जागा निश्चित करणे, शासकीय जागा उपलब्ध करुन देणे.
खाजगी गुंतवणुकदारास आकर्षित करण्यासाठी वित्तीय संस्थांची निवड करणे, शक्य असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या देणे.
आवश्यकतेप्रमाणे प्रकल्पात आर्थिक सहभाग घेणे.
टर्मिनल मार्केट संदर्भात निविदा प्रक्रिया व खाजगी उद्योगांची निवड करण्यासाठी मा. पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना झालेली आहे. मा.प्रधान सचिव, सहकार व पणन यांची नोडल ऑफिसर व मा.पणन संचालक यांची अतिरिक्त नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे.
राज्यात उभारण्यात येणा-या टर्मिनल मार्केटकरिता राज्य स्तरीय समितीने खालीलप्रमाणे संस्थांची वित्तीय संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.
अ.क्र.
टर्मिनल मार्केट
संस्थेचे नाव
1
मुंबई (ठाणे)
येस बँक लि.
2
नाशिक
नाबार्ड कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा. लि.
3
नागपूर
ॲपिटको लि., हैद्राबाद
टर्मिनल मार्केट सद्यस्थिती
केंद्र शासनाने विविध राज्यात प्रथम 8 व नंतर 21 टर्मिनल मार्केटस उभारण्याचा निर्णय घेतला.
राज्यामध्ये मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहेत.
मुंबई टर्मिनल मार्केट
प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.200-250 कोटी.
प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 3000 मे.टन इतकी अपेक्षित.
प्रकल्पास आवश्यक जागा 125 एकर आहे. मौजे बाबगाव, जि.ठाणे येथील 92 एकर जागा पणन मंडळास हस्तांतर करणेचा शासन निर्णय झालेला आहे.
सदर जागा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
92 एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
नाशिक टर्मिनल मार्केट
प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.60 कोटी.
प्रकल्पास आवश्यक जागा 100 एकर
प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 1000 मे.टन इतकी अपेक्षित.
प्रकल्पाकरीता पिंप्री सय्यद येथील शासकीय जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे
नागपूर टर्मिनल मार्केट
प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.70 कोटी.
प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 750 मे.टन इतकी अपेक्षित.
100 एकर जागेची आवश्यकता आहे.
प्रकल्पास मौजे काळडोंगरी ता.जि. नागपुर येथील आवश्यक 100 एकर शासकीय जागा पणन मंडळास हस्तांतर करणेचा निर्णय झाला. जागा हस्तांतर करणेची प्रक्रिया सुरु.