कांद्याचे विकीरण
- दिर्घ साठवणुकीमधील कांद्याचे नुकसान नियंत्रित करण्याचा उद्देश.
- राज्यामधील प्रमुख कांदा उत्पादन केंद्रावर विकीरण सुविधा प्रस्थापित करणे.
- शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था किंवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी.
- भाभा ॲटॉमीक रिसर्च सेंटरने विकसीत केलेल्या विकीरण तंत्रज्ञानाचा अवलंब.
- कांद्याच्या सुगी पश्चात होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण केल्याने आर्थिक फायदा.
पणन मंडळामार्फत वाशी नवी मुंबई येथे विकिरण प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये कांदा, आंबा, मसाला पदार्थ यांचे विकिरण करण्यास मदत होणार आहे. तसेच पणन मंडळाने लासलगाव येथील कृषक ही विकिरण सुविधा पणन मंडळाने चालविण्यास घेतली आहे. या सुविधेतून पणन मंडळाने हापुस व केशर आंबा तसेच बेदाना यांचे विकिरण केले आहे.