-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

कार्ये व अधिकार

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधिल कलम 39 (ज) या अधिनियमाच्या तरतुदींना अधिन राहून, मंडळ पुढील कार्ये पार पाडीत असून अशी कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक अथवा इष्ट असतील अशा गोष्टी करण्याचा अधिकार मंडळास आहे. अधिनियमातील तरतुदींनुसार कृषि पणन मंडळाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • बाजार व बाजारक्षेत्रे यांच्या विकासासाठी बाजार समित्यांनी हाती घेतलेले कार्यक्रम धरून अशा बाजार समित्यांच्या कामांमध्ये समन्वय राखणे;
  • कृषि उत्पन्न बाजारांच्या विकासासाठी राज्यस्तरीय नियोजनाचे काम हाती घेणे;
  • कृषि उत्पन्न पणन विकास निधीची व्यवस्था ठेवणे व त्याचे प्रशासन करणे;
  • बाजार समितीने हाती घेतलेल्या बांधकाम कार्यक्रमासंबंधातील आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्याच्या तिच्या कामांवर पर्यवेक्षण करणे आणि त्याबाबत तिला मार्गदर्शन करणे;
  • कृषि उत्पन्नाच्या पणनाशी संबंधित असलेल्या गोष्टींबाबत प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करणे;
  • या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी मंडळ निश्चित करील अशा अटींवर व शर्तींवर बाजार समित्यांना अर्थसहाय्य किंवा कर्ज देणे;
  • कृषि विषयक पणनाच्या संबंधातील विषयांबाबत चर्चासत्रे, कार्यसत्रे व प्रदर्शने आयोजित करणे किंवा त्यांची व्यवस्था ठेवणे.
  • कृषी उत्पन्नाच्या पणनाच्या संबंधात सर्वसाधारण हिताच्या असतील अशा इतर गोष्टी करणे.
  • या अधिनियमान्वये त्यांच्याकडे विशेषरीत्या सोपविण्यात आले असेल असे इतर कोणतेही कार्य पार पाडणे.
  • राज्य शासन त्यांच्याकडे सोपविल अशी तत्सम स्वरूपाची इतर कार्ये पार पाडणे.