-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply
उद्दीष्टपुर्ती
 
कृषि पणन मंडळामार्फत केलेल्या उल्लेखनीय उद्दिष्टपूर्तीचा तपशिल
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत गेल्या 34 वर्षांपासून राज्यातील विविध फळे, भाजीपाला, प्रक्रियायुक्त उत्पादनाच्या निर्यातवृध्दीच्या दृष्टीने सातत्याने उपक्रम राबविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कृषि पणन मंडळामार्फत युरोप, अमेरिका, उत्तर पूर्वेकडील देश, आखाती देश जपान, इत्यादी देशांमध्ये विविध फळे आणि भाजीपाल्याची निर्यात करण्यात आलेली आहे. कृषिमालाचे अधिक उत्पादन होऊन देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी झाल्यास अशा प्रकारचे निर्यातीचे उपक्रम राबविल्यामुळे उत्पादक शेतक-यांना किफायतशीर दर प्राप्त होण्यास एक चांगला पर्यायी मार्ग उपलब्ध होतो.याकरीता राज्य कृषि पणन मंडळामध्ये निर्यात विभाग कार्यरत आहे. सदर विभागामध्ये प्रशिक्षीत मनुष्यबळाचे माध्यमातुन शेतकरी प्रशिक्षण,नविन निर्यातदार घडविणे, सुविधा केंद्रांचे संचालन इ. कामकाज नियोजनबध्द रीत्या व प्रभावीपणे केले जाते.
  • कृषिमालाची प्रायोगिक आणि व्यावसायिक निर्यात.
  • ग्लोबलगॅप प्रमाणिकरण अनुदान योजनेची यशस्वी अंमलबजावणी.
  • राज्यामध्ये विविध प्रकारच्या कृषिमालाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा केंद्रांची उभारणी आणि वापर.
  • कृषिमाल निहाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्यात वृध्दी कार्यक्रमांमध्ये सहभाग.
  • हापूस आंबा, केशर आंबा, डाळिंब, केळी, संत्रा आणि कांदा कृषि निर्यात क्षेत्रांची यशस्वी अंमलबजावणी.
  • राज्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आणि आय.एफ.ए.डी. यांच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत नोडल एजन्सी म्हणून कार्यरत.
  • ईस्त्रायल आणि युरोप या देशांमध्ये शेतकरी अभ्यास दौ-यांचे यशस्वी आयोजन.
ex1
ex2
ex3
आंबा निर्यात

महाराष्ट्रातील प्रमुख फळ उत्पादनांपैकी आंबा हे महत्वाचे फळ पिक आहे. देशभरात उत्पादीत होणा-या विविध आंब्यांच्या जातींपैकी हापूस आणि केशर या प्रसिध्द आणि निर्यातीस मागणी असलेल्या प्रमुख जातींच्या आंब्याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घेतले जाते. जागतीक पातळीवर आंब्याची निर्यात करण्याकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत महत्वाची भूमिका बजावण्यात येत आहे. दूर अंतरावरील देशांमध्ये आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करता यावी यासाठी अपेडा, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कृषि पणन मंडळामार्फत सी. ए. कंटेनरद्वारे हापूस आणि केशर आंबा निर्यातीचे उपक्रम राबविण्यात आलेले असून, त्याअंतर्गत सन 1998 मध्ये लंडन येथे दोन सी. ए. कंटेनरद्वारे आणि सिंगापूर येथे एका सी. ए. कंटेनरद्वारे आंब्याची निर्यात करण्यात आलेली आहे. तसेच सदर उपक्रमांतर्गत सन 2000 मध्ये हाँग काँग मार्गे चीन या देशामध्ये केशर आंब्याची निर्यात करण्यात आली. त्यामुळे राज्यातील आंब्यास एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मोलाची मदत झाली.

आंबा हंगाम 2018 मध्ये पणन मंडळाच्या विविध सुविधा केंद्रावरुन 1881 मे.टन आंब्यावर निर्यातीसाठी प्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • विकिरण सुविधा, वाशी, नवि मुंबई - सदर सुविधेवरून 613.62 मे.टन अमेरीका येथे व ऑस्ट्रेलिया येथे 18.54 मे.टन असा एकुण 632.51 मे.टन आंबा निर्यातीसाठी प्रक्रिया करण्यात आलेला आहे. तसेच सदर सुविधेवरुन सन 2018 मध्ये 0.352 मे.टन डाळींब देखील निर्यात झाले आहे.
  • भाजीपाला प्रक्रीया सुविधा,वाशी,नवि मुंबई – सदर सुविधेवरून युरोप येथे 245.40 मे. टन, अमेरीका येथे 153.52 .मे.टन, ऑस्ट्रेलिया येथे 16.61 मे.टन तर रशिया या देशात 3.26 मे.टन ,मॉरीशियस या देशास 1.00 मे.टन असा एकुण 419.79 मे.टन आंबा प्रक्रिया करण्यात आला आहे.
  • व्ही.एच.टी. सुविधा वाशी,नवि मुंबई – सदर सुविधेवरुन युरोप येथे 22.66 मे.टन , जपान येथे 24.21 मे. टन, न्युझीलंड येथे 29.79 मे.टन, दक्षिण कोरीया येथे 49.52 मे.टन असा एकुण 126.18 मे.टन आंबा निर्यात पूर्व प्रक्रिया करण्यात आला आहे.
  • आंबा निर्यात सुविधा केंद्र, रत्नागीरी - सदर सुविधेवरून युरोप येथे 1.20 मे. टन, अमेरीका येथे 2.78 मे.टन, रशिया या देशास 4.25 मे.टन तर देशांतर्गत बाजारपेठेत 30.90 मे.टन असा एकुण 39.13 मे.टन आंबा प्रक्रिया करण्यात आला आहे.
  • आंबा निर्यात सुविधा केंद्र,जामसंडे जि. सिंधुदुर्ग – सदर सुविधेवर आंबा पल्प साठवणुक 192 मे.टन व देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी आंबा 35.67 मे.टन असा एकुण 227.67 मे.टन आंबा प्रक्रीया करण्यात आला आहे.
  • द्राक्ष व डाळींब निर्यात सुविधा केंद्र ,बारामती जि.पुणे - सदर सुविधेवरून युरोपसाठी 218.79 मे.टन, यु.एस.ए. करीता 217.64 मे.टन असा एकुण 436.43 मे.टन आंबा प्रक्रीया करण्यात आला आहे.

राज्यातील आंब्याची देशांतर्गत विपणन व्यवस्था मजबूत होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंब्याच्या निर्यातीत वृध्दी होण्यासाठी कृषि पणन मंडळामार्फत महामँगो या शिखर सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.

जपान बरोबरच अमेरिका ही सुध्दा एक मोठी आणि चांगला दर देणारी बाजारपेठ असून, वरिष्ठ शासकीय पातळ्यांवर केलेल्या प्रयत्नांमुळे 18 वर्षांच्या बंदीनंतर अमेरिका या देशानेसुध्दा भारतीय आंब्याच्या आयातीवर असलेले निर्बंध शिथील केले आणि माहे मे, 2007 मध्ये भारतातून अमेरिका येथे आंबा निर्यातीची परवानगी प्राप्त झाली. त्यामुळे सन 2008 च्या आंबा हंगामात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत अमेरिकेतील न्यूयॉर्क, अटलांटा, सॅनफ्रान्सिस्को इत्यादी बाजारपेठांमध्ये एकूण 13 कंन्साईन्मेंटद्वारे आंब्याची यशस्वी निर्यात करण्यात आली.

राज्यातील आंब्याची देशांतर्गत विपणन व्यवस्था मजबूत होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंब्याच्या निर्यातीत वृध्दी होण्यासाठी कृषि पणन मंडळामार्फत महामँगो या शिखर सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.

ex1
ex2
ex3
द्राक्षे निर्यात

राज्यातून द्राक्षाच्या निर्यातीत वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळामार्फत महाग्रेप्स या शिखर सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून, महाग्रेप्स यांचेमार्फत दरवर्षी सुमारे 100 ते 120 कंटेनर इतक्या द्राक्षांची युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. द्राक्ष निर्यातीच्या बाबतीत युरोपियन बाजारपेठेमध्ये महाग्रेप्स या नावाचा स्वतंत्र ब्रँड स्थापित झालेला आहे. याबरोबरच राज्यातील सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी यासाठी कृषि पणन मंडळामार्फत संबंधीत संस्थांना संपुर्ण तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सन 2003 पासून द्राक्षांच्या निर्यातीसाठी वापर होणा-या सुविधांना अपेडा चे प्रमाणिकरण प्राप्त झालेले आहे.

डाळिंब निर्यात

डाळिंब हे एक महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे फळ पीक आहे. डाळिंबाच्या औषधी गुणधर्मामुळे डाळिंबाला महत्व प्राप्त झालेले असून, युरोप, अमेरिका यासाख्या आंतरराष्ट्रीय देशांमध्ये डाळिंबाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने स्वतः पुढाकार घेऊन राज्यातील डाळिंब उत्पादक सहकारी संस्थांना त्यांनी उत्पादित केलेल्या डाळिंबाची आखाती देशांमध्ये यशस्वीरित्या निर्यात करून दिलेली आहे. तथापि, डाळिंबाच्या निर्यातीत वाढ होण्याच्या उद्देशाने डाळिंबाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून अपेडा, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कृषि पणन मंडळामार्फत बारामती, इंदापूर, आटपाडी, लातुर, कळवण व चांदवड  येथे डाळिंबाकरीता  निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे.  कृषि पणन मंडळाच्या विकीरण सुविधेवरुन सन 2016-17 व सन 2018 मध्ये खाजगी निर्यातदारांमार्फत 1.85 मे.टन  अमेराका देशास डाळींबाची निर्यात झालेली आहे , सदर देशास डाळींब निर्यातीस प्रचंड वाव आहे. 

संत्रा निर्यात

राज्यामध्ये संत्र्याचे उत्पादन जरी मोठ्या प्रमाणावर घेतले जात असले तरी सदर उत्पादनाची निर्यात मात्र अत्यंत नगण्य आहे. राज्यातून संत्रा निर्यातीस चालना मिळावी या उद्देशाने कृषि पणन मंडळामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, सन 2002 मध्ये कृषि पणन मंडळामार्फत आखाती देशांमध्ये समुद्रमार्गे संत्र्याच्या चाचणी निर्यातीचा प्रथम उपक्रम राबविण्यात आला. सदरचा संत्रा चांगल्या प्रकारे दुबई बाजारपेठेमध्ये पोहोचला. दूर अंतरावरील देशांनासुध्दा संत्र्याची निर्यात व्हावी या उद्देशाने सन 2005 मध्ये हॉलंड बाजारपेठेमध्ये संत्र्याच्या कंटेनरची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. कृषि पणन मंडळामार्फत निर्यातीसाठी आवश्यक  सुविधांची कारंजा (घा.) ता.आष्टी जि. वर्धा व वरुड जि.अमरावती येथे उभारणी करण्यात आलेली आहे. कारंजा (घा.) ता.आष्टी जि. वर्धा येथील सुविधेवरुन श्रीलंका व आखाती देशांमध्ये संत्रा निर्यातीचे कामकाज करणेत आलेले आहे.

 
केळी निर्यात

केळीचे उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असुन देखील निर्यात नगण्य आहे. केळी निर्यातीच्या प्राथमिक प्रयत्नांमध्ये कृषि पणन मंडळ नेहमीच अग्रेसर राहीलेले आहे. केळीचा पहीला 40 फुटी कंटेनर सन 2002 आखाती देशांत यशस्वीरीत्या पाठविणेत आलेला होता. महाबनानाच्या माध्यमातुन कृषि पणन मंडळाने 16 मे.टन केळी आखाती देशांत पाठविलेला होता. केळी निर्यातीच्या अनुषंगाने कृषि पणन मंडळाने रावेर जि.जळगाव , बसमतनगर, जि. हिंगोली व इंदापुर जि. पुणे (कामकाज प्रगतीपथावर) येथे केळी निर्यात केंद्रांची उभारणी केलेली आहे ज्यामध्ये हाताळणी यंत्रणा, प्रशितकरण, शितगृह व पिकवण कक्ष यांचा समावेश आहे.

लिंबू आणि मोसंबी निर्यात

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत आखाती देशामध्ये लिंबू आणि मोसंबी अशा मिक्स कंटेनरची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आलेली असून, त्यामुळे आखाती देशांमध्ये सदर उत्पादनांच्या निर्यातीसाठी चांगला वाव असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

फुले निर्यात

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत सिंगापूर येथे हवाईमार्गे जर्बेरा आणि कार्नेशन या जातीच्या फुलांची निर्यात करण्यात आलेली असून, जर्बेरा, कार्नेशन या फुलांबरोबरच गुलाब व इतर जातीच्या फुलांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी आहेत. राज्य कृषि पणन मंडळाने तळेगाव जि. पुणे , सातारा व दिंडोरी जि. नाशिक या तीन ठिकाणी फुले निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली आहे.

 
आंतरराष्ट्रीय निर्यातवृध्दी कार्यक्रमांमध्ये सहभाग

राज्यामध्ये उत्पादित होणा-या विविध उत्पादनांच्या निर्यातीत वाढ व्हावी या उद्देशाने कृषि पणन मंडळामार्फत विविध देशातील आंतरराष्ट्रीय निर्यातवृध्दी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो व त्याद्वारे राज्यातील विविध फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीला चालना देण्याचे तसेच त्यामध्ये वाढ करण्याचे कामकाज करण्यात येते.

  • आंतरराष्ट्रीय बाजार विकास :- विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या करणे व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग -
  • आंबा - चिन (2003-04), जपान (2000 - 2005) व अमेरिका (2003-2006) – न्युझिलंड (2013), मॉरिशस (2016), ऑस्ट्रेलिया (2016-2017), साउथ कोरीया (2018), इराण ( 2018) , कजाकिस्तान (2018), युरोपातील नविन देश - पोलंड (2018)
  • डाळींब – अमेरिका (2014,2016,2018)
  • हिरवी मिरची - सौदी अरेबिया (2016)
  • आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग – इंग्लंड, जर्मनी, चीन, जपान, दुबई इ.
  • शेतकरी अभ्यास दौरे – स्पेन, हॉलंड, फ्रान्स, इस्त्राईल, दुबई इ.
  • प्रयोगिक तत्वावर निर्यात – इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरीका, सिंगापुर, बहारीन, दुबई इ.
  • उत्पादक- निर्यातदार –आयातदार बैठकांचे आयोजन
ex1
ex2
ex3
ex3
निर्यात विषयक कार्यशाळा

राज्यात उत्पादित होणारा कृषिमालाची निर्यातवृद्धी होण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित घटक जसे NPPO, अपेडा, कृषि विभाग, निर्यातदार, शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्थांच्या शिखर संस्था, प्रक्रियादार इ. साठी आंबा, डाळींब, कांदा, केळी , व भाजीपाला या पिकाच्या यांची कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे चालु वर्षात कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत.

  • कोकणातील आंबा निर्यातीस चालना देणेसाठी रत्नागिरी आंबा निर्यात सुविधा केंद्राचे अपेडा प्रमाणीकरण करण्यात आलेले असुन दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी रत्नागिरी येथे उत्पादक व निर्यातदार यांचे खरेदीदार – विक्रेता संम्मेलन आयोजीत करण्यात आलेले होते.
  • अकोला जिल्ह्यातुन केळी निर्यातीस चालना देण्यासाठी दि. 27.04.2017 रोजी पणन मंडळ, अपेडा, मुंबई व जिल्हा प्रशासन अकोला यांचे समन्वयाने अकोट जि. अकोला येथे केळी पिकावर मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या अध्यक्ष्यतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. व त्याच दिवशी इराण येथे पहीला कंटेनर पाठवुन केळी निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला.
  • अमरावती जिल्ह्यातुन भाजीपाला निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अमरावती यांच्या अध्यक्ष्यतेखाली पणन मंडळ, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि विभाग व अपेडा यांच्या विदयमाने कार्यशाळा दि. 27.04.2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय , अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेली होती.
  • नव्याने सुरुवात झालेले कोरीया, ऑस्ट्रेलिया, इराण,या देशात जास्तीत जास्त आंबा निर्यात होण्यासाठी दि. 15 व 16 मे 2018 रोजी अपेडाच्या मध्यमातुन आंतरराष्ट्रीय खरेदीदार – विक्रेता संम्मेलन आयोजीत करण्यात आलेले होते. या संम्मेलनात 18 देशांच्या प्रतिनिधी व देशातुन 100 पेक्षा जास्त कृषि विषयक संस्थांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थीत होते. या सर्वांनी व्ही.एच. टी. वाशी , विकिरण सुविधा केंद्र,वाशी, व भाजीपाला प्रक्रीया युनीट वाशी येथे दि. 16.05.18 रोजी सुविधेवर भेटी दरम्यान सुविधांबाबत प्रशंसोद्गार काढले होते.