कृषि पणन मंडळाच्या शेती विभाग,तळेगांव अंतर्गत 150 एकर जमिन क्षेत्र आहे. सदरचे क्षेत्र मुख्यफार्म व गिलबिल पट्टी असे दोन वेगवेगळया ठिकाणी असून मुख्यफार्म हे प्रक्षेत्र तळेगांव गाव भागास लागून आहे. आणि गिलबिल पट्टी हे प्रक्षेत्र मुंबई – पुणे महामार्गास लागून आहे.
सदर प्रक्षेत्रावरील फळबागचे व्यवस्थापन जानेवारी 2019 पासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था पाहत आहे.
मुख्यफार्मवरील अ.क्र. ‘ब’ तलाव क्षेत्र (42 एकर) मच्छिमारीसाठी वार्षिक भाडेकरारावर सहकारी मच्छिमार सोसायटी यांना देण्यात आलेला आहे.
मुख्यफार्म येथील जमीन क्षेत्राची शासकीय मोजणी करुन घेण्यात आलेली आहे.
मुख्यफार्म येथील संपुर्ण जमीन क्षेत्रास कंपाऊड वॉल बांधकाम कामकाज चालू आहे.
सदर मुख्यफार्म जमीन प्रक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर प्रकल्पाचे बांधकाम चालू आहे.