-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

फळे आणि भाजीपाला निर्यातदारांना सुवर्णसंधी

व्हेपर हीट ट्रीटमेंट फॅसीलीटी, वाशी, नवि मुंबई :

 • राज्य कृषि पणन मंडळाने अद्ययावत सुविधांनी युक्त अशी व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा, वाशी नवि मुंबई येथे उपलब्ध केली आहे.
 • व्ही.एच.टी सुविधेमुळे फळमाशी या कीडीचे क्वारंटाईन ट्रीटमेंट करता येते.
 • सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात पहीली सुविधा आहे.
 • हे मशिन अपेडा, नवि दिल्ली यांनी आयात केले असुन कृषि पणन मंडळाने त्याची उभारणी केलेली आहे. सदर मशिनचा वापर करुन खाजगी निर्यातदारांमार्फत व्यावसाईक निर्यात होत असुन त्यामध्ये जपान, न्युझीलंड, दक्षिण कोरीया, युरोपीय देश, व मॉरीशस यांचा समावेश होतो.
 • व्हीएचटी वाशी येथील सुविधा - व्ही.एच.टी. सुविधा - 1.5 मे.टन / बॅच,प्रीकुलींग सुविधा: 5 मे.टन / 6 तास, कोल्ड स्टोरेज : 50 मे.टन., मटेरीयल हॅण्डलींग सिस्टीम: 1.5 मे.टन / तास
 • या सुविधेवरुन सुमारे 50,000 मे.टन पेक्षा जास्त फळे व भाजीपाल्याची जगातील विविध देशांत निर्यात झालेली आहे.
 
ex_vht1
ex_vht2
ex_vht3
ex_vht4
ex_vht5
ex_vht6

विकीरण सुविधा, वाशी

 • केंद्र शासनाच्या अणु उर्जा विभागाचे अन्न विकीरण नियम 2012 नुसार, कृषि पणन मंडळाने भाजीपाला, मसाले , व इतर अन्न पदार्थाचे विकीरणासाठी वाशी नवि मुंबई येथे विकीरण सुविधा केंद्राची उभारणी केलेली आहे.
 • विकीरण ही अमेरीका देशास आंबा व डाळींब निर्यात करावयाचे झाल्यास आवश्यक प्रक्रीया आहे.
 • सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील एक सुविधा असुन यामध्ये कोबाल्ट – 60 चा वापर करुन गॅमा किरणांद्वारे विकीरण प्रक्रीया केली जाते.
 • आंबा फळातील कोयीतील भुंग्यावर क्वारंटाईन प्रक्रीयेसाठी विकीरण केले जाते.
 • ही सुविधा एटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड , अणु उर्जा विभागा मार्फत प्रमाणित केलेली आहे.
 • निर्यातीसाठी ही सुविधा नॅशनल प्लॅन्ट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन यांचेमार्फत प्रमाणित केलेली आहे.
 • ऑस्ट्रेलियन सरकारचे तपासणी अधिकारी यांनी भेटीअंती सदर सुविधेस प्रमाणीकरणे केलेले असुन त्याद्वारे आंबा निर्यातीस सुरुवात झाली आहे.
 • या सुविधेवरुन आंबा, डाळींब, मसाले, डाळी, पिठ, पशुखाद्य , कांदा इ. वर विकीरण प्रक्रीया करता येत असुन ही उत्पादने अमेरीका, युरोपीय देश, पुर्व आशियाई देश इ. येथे निर्यात होत आहेत.
 • या सुविधेवर – विकीरण क्षमता – 500 केसीआय,शितगृह – 25 मे.टन क्षमतेचे 2 , प्रशितकरण 5 मेटन / बॅच.सद्यस्थीतीत विकीरणक्षमता ही 426 केसीआय इतकी आहे.दि.19.07.2018 चे परीपत्रकानुसार विकीण प्रक्रीयेचे दर खालील प्रमाणे आहेत -
   
क्र. तपशील विकीरण सरासरी डोस (ग्रे) विकीरण प्रकीयेचा दर ( रु. / किलो)
कांदा, बटाटा व लसुण 60-90 1.00/-
तृणधान्य , ग्रेन्युल, पीठे, मैदा व तत्सम पदार्थ 250- 1000 2.50/-
भाजीपाला कापलेल्या भाजीपाल्यासहीत 200 - 2500 3.75/-
ड्राय फ्रुटस व कन्फेक्शनरी 250-5000 6.25/-
मसाले ( जायफळ व वेलची व्यतीरीक्त ) 8000-10000 7.00/-
जायफळ व वेलची 8000-10000 9.00/-
पशुखाद्य   Upto 4000 4.00/-
पशुखाद्य   4001-7000 6.00/-
पशुखाद्य   7001 - 8000 6.50/-
पशुखाद्य   8001-10000 8.00/-
१० पॅकेजींग मटेरीयल 7000-10000 10.00/-
११ हर्बल प्रोडक्टस, कॉस्मेटीक्स व  कलर पावडर 6000-14000 9.00/-

 
ex_Irra_1
ex_Irra_2
ex_Irra_3

भाजीपाला प्राक्रीया सुविधा केंद् ( व्हीपीएफ, वाशी)

आंबा व चार प्रकारच्या भाजीपाल्यावर युरोपीयन युनियनने घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने सदर निर्यात पुन्हा सुरळीत होणेकामी कृषि पणन मंडळाने भाजीपाला प्रक्रीया सुविधा केंद्राची उभारणी केलेली आहे. सदर सुविधेवरील मशिनरी च्या क्षमता खालीलप्रमाणे आहेत.

 • कारले प्रक्रीया यंत्रणा - 10 मे.टन / दिवस
 • भेंडी प्रक्रीया यंत्रणा - 18 मे.टन / दिवस
 • हिरवीमिरची प्रक्रीया यंत्रणा - 4 मे.टन / दिवस
 • वांगी प्रक्रीया यंत्रणा – 4 मे.टन / दिवस
 • इतर भाजीपाला प्रक्रीया यंत्रणा - 4 मे.टन / दिवस
 • प्रशितकरण - 5 मे.टन / 6 तास
 • शितगृह – 150 मे.टन
 • उष्ण जल प्रक्रीया यंत्रणा – 1 मे.टन / तास

ही सुविधा सद्यस्थीतीत मे.खुशी इंटरनॅशनल यांचे मार्फत चालविणेत येत असुन त्यांना वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर दिलेली आहे. सदर सुविधा ही अपेडा मार्फत प्रमाणीत करणेत आलेली असुन आजतागायत सुमारे 4371 मेटन फळे व भाजीपाला निर्यात झालेला आहे.

ex_vpf1
ex_vpf2
ex_vpf3

आंब्यावर निर्यातपुर्व प्रक्रियेची उपयुक्त माहीती

आवश्यक प्रक्रिया जाती प्रक्रीयेच्या पध्तदती बॉक्स साईज निर्यात देश 
विकीरण प्रक्रिया हापूस, केसर, बेंगनपेल्ली, राजापूरी, तोतापूरी विकीरण कमीतकमी 400 ग्रेज व जास्तीत जास्त 1000 ग्रेज छोट्या आंब्यांचे बॉक्स – हापूस व केसर – 3.5 कि. ग्रॅम – 370 एम.एम. X 275 एम.एम.  X 90 एम.एम. मोठ्या आंब्यांचे बॉक्स – बेंगनपेल्ली, तोतापुरी, लंगडा, राजापूरी– 4.2 कि. ग्रॅम – 365 एम.एम. X 265 एम.एम.  X 110 एम.एम. अमेरिका, ऑस्ट्रेलिया
व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया महाराष्ट्र व गुजरात – हापूस, केसर इतर राज्य- आंध्र प्रदेश – बेंगनपेल्ली उत्तर प्रदेश – चौसा, लंगडा प. बंगाल – मल्लिका फळाच्या आतील गराचे तपमान 47.5 डिग्री सेल्सीयस आल्यावर 20 मिनीटे कोरोगेटेड फायरबोर्ड बॉक्स किंवा थर्मोकोल बॉक्स – बॉक्सवरील वायुविजनासाठी असलेली भोके 1.5 एम. एम. पेक्षा कमी मेशच्या जाळीने आच्छादीत असावीत. जर कोरोगेटेड फायरबोर्ड बॉक्सला लॅमिनेशन केलेले नसेल तर असा बॉक्स वापरापूर्वी रसायनांची उर्वरित अंश तपासणी केलेला असावा. तसेच बॉक्सवर “For Japan” असे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. जपान
व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया सर्व भारतीय वाणांचे आंबे 46.5 डिग्री सेल्सीयस 30 मिनीटांसाठी / 47.5 डिग्री सेल्सीयस 20 मिनीटांसाठी आयातदार देशांच्या मानकांनुसार युरोपीय देश
व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया सर्व भारतीय वाणांचे आंबे 48 डिग्री सेल्सीयस 20 मिनीटांसाठी आयातदार देशांच्या मानकांनुसार मात्र जाळीचे आच्छादन अत्यावश्यक न्यूझीलंड
व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया सर्व भारतीय वाणांचे आंबे 47.5 डिग्री सेल्सीयस 20 मिनीटांसाठी आयातदार देशांच्या मानकांनुसार मात्र जाळीचे आच्छादन अत्यावश्यक दक्षिण कोरिया, मॉरीशस
उष्ण जल प्रक्रिया सर्व भारतीय वाणांचे आंबे

500 ग्रॅम वस्तूमानापर्यंत -48 डिग्री सेल्सीयस 60 मिनीटांसाठी ,

500 ते 700  ग्रॅमच्या वस्तूमानासाठी-  48 डिग्री सेल्सीयस 75 मिनीटांसाठी,

700 ते 900  ग्रॅमच्या वस्तूमानासाठी -48 डिग्री सेल्सीयस 90 मिनीटांसाठी
आयातदार देशांच्या मानकांनुसार मात्र दक्षिण कोरीयासाठी जाळीचे आच्छादन अत्यावश्यक युरोपीय देश, न्यूझीलंड, इराण  व दक्षिण कोरिया