महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
(अधिनस्त)
महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन योजना
उद्देश
बाजार समितीच्या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती नंतर आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कार्यान्वीत.
- शासनाची दि. 29.09.1988 चे आदेशान्वये शासन व पणन मंडळ आर्थिक सहाय्य करणार नाही या अटीवर मान्यता.
- प्रत्यक्ष योजना दि. 01.07.1991 पासून कार्यान्वीत.
अंमलबजावणी
- दि. 29.09.1988 चे आदेशान्वये कृषि पणन मंडळावर पेन्शन योजना राबविण्याची जबाबदारी सोपविली.
- तांत्रिक कारणास्तव दि. 01.07.1991 ते 31.03.2013 बाजार समिती संघामार्फत योजनेची अंमलबजावणी.
- दि. 01.04.2013 पासून पुन्हा कृषि पणन मंडळाकडे हस्तांतरीत.
पणन मंडळाचे अंतर्गत पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन समित्या.
- मा. पणन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पणन मंडळाने नेमलेली उपसमिती.
- या उपसमितीने नेमलेली कर्मचारी प्रतिनिधींची कार्यकारी समिती.
योजना हस्तांतरणानंतर घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय.
- योजनेस आयकर मुक्त व ज्यादा व्याजदराने उत्पन्न मिळावे यासाठी सदर योजना स्वतंत्ररित्या न राबविता कृषि पणन मंडळांतर्गत राबविण्यात येते.
- दि. 01 एप्रिल 2013 पासून बाजार समितीच्या सेवेतील कर्मचार्यांसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू.
- दि. 01 एप्रिल 2018 पासून नवीन अंशदायी पेन्शन योजनेतर्गत सेवेतील कर्मचार्यांना प्रत्यक्ष मिळालेले व्याजदरानुसार रक्कम जमा.
- या पेन्शन योजनेतर्गत कर्मचार्याचे आकस्मिक निधन झालेस त्यांच्या वारसाला रू. 50,000/— अर्थसहाय्य.
- दि. 01 ऑगस्ट 2014 पासून जुन्या पेन्शन योजनेच्या कर्मचार्यांना पेन्शनमध्ये 30% वाढ.
- योजनेत सामिल सभासदांचे स्वतंत्र खाते तयार करून प्रत्येक वर्षअखेर त्यांच्या जमा रक्कमा संबंधित बाजार समित्यांना कळविल्या जातात.
- सदर योजनेतर्गत मार्च 2018 अखेर रक्कम रू. 146.72 कोटी गुंतवणूक.
मार्च 2018 अखेर योजनेत सामिल बाजार समिती व कर्मचारी आढावा
|
अ.क्र |
तपशिल |
बाजार समिती |
कर्मचारी |
१ |
सामिल बाजार समित्या |
१७७ |
२५२४ |
२ |
बाहेर पडलेल्या बाजार समित्या |
७० |
६९६ |
३ |
सामिल नसलेल्या बाजार समित्या |
६० |
--- |
|
|
३०७ |
३२२० |
१ |
जुने सेवानिवृत्त वेतनधारक |
|
७३२ |
२ |
नवीन अंशदायी निवृत्ती वेतन धारक |
|
८७ |
|
एकूण |
|
८१९ |