-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

अंशदान -

कायद्यातील कलम ३७ (२) मधील तरतूदीनुसार राज्यातील प्रत्येक बाजार समितीस, कृषि पणन मंडळाकडे वार्षिक अंशदान जमा करावे लागते. राज्य शासनाकडील जा.क्र. अेपीएम/१०८५/६५६८/६२१/११-सी दि.४/४/१९८८ चे अधिसुचनेनुसार बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार खालील प्रमाणे अंशदानाचे दर निश्चित केलेले आहेत.

अ.क्र. बाजार समिती वार्षिक उत्पन्न अंशदान दर
रु. १.७५ लाखापेक्षा कमी १ %
रु. १.७५ ते ३ लाख २ %
रु. ३.०० लाख ते १०.०० लाख ३ %
रु. १० लाखांपेक्षा जास्त ५ %

कायद्यातील कलम ३७ (२) मधील तरतूदीनुसार प्रत्येक बाजार समितीस आर्थिक वर्ष संपल्यानंतर २ महिन्यांचे आत आपली आर्थिक पत्रके कृषि पणन मंडळाकडे अंशदान आकारणीसाठी सादर करावी लागतात.

सन २०२२-२३ चे उत्पन्नानुसार एकूण ३०६ बाजार समित्यांपैकी २४२ बाजार समित्यांची अंशदान आकारणी मंजूर झालेली असून वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार एकूण रु.३६.९३ कोटी अंशदान आकारणी करण्यात आली आहे.