जागतिक बँक अर्थसहाय्यित
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प
राज्यातील शेतकऱ्याना निवडक शेतमाल लागवडपूर्व व काढणीपश्चात बाजारभाव उपलब्ध करून शेतमालाच्या विक्री मूल्यामध्ये वाढ होऊन फायदा व्हावा या उद्देशाने राज्यस्तरावर कार्यरत एकमेव यंत्रणा आहे .
या यंत्रणेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना विविध पिकांच्या संदर्भात लागवडपूर्व व काढणीपश्चात नियोजन करणे शक्य होईल.तसेच कोणत्या पिकाचे किती उत्पादन घ्यावयाचे, ते उत्पादन कधी व कोठे विक्री करावयाचे या विषयी शेतकऱ्यांना योग्य ते निर्णय घेता येतील. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
अशा प्रकारची माहिती हि शेतकरी, शासन, धोरणकर्ते, व्यापारी, प्रक्रियादार उद्योजक, आयात व निर्यातदार, किरकोळ विक्रेते, उपभोक्ता, कृषी विषयक घटक यांना उपयुक्त ठरेल.यामुळे प्रादेशिक, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमालाचे उत्पादन व किमतीविषयक धोरणांमध्ये समन्वय साधला जाऊन दिर्घकालावधीत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
शेतमालसंबंधी खालील माहिती देण्यात येईल
यंत्रणेमार्फत सोयाबीन ,मका, तूर व कांदा या पिकांच्या मागील दहा वर्षातील बाजारभाव व उत्पादन याचा शास्त्रशुध्द पद्धतीने अभ्यास करून पुढील कालावधीत संभाव्य किमतीचे अंदाज वर्तविण्यात येतात.
डिसक्लेमर -सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यातील किंमत विषयक अनुमान दर्शवितो. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक ( उदा. वातावरणातील बदल किंवा डिंकांवरील रोगराई ) तसेच आर्थिक घटकांमुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. वाचकांनी सदर अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा, अन्यथा होना-या नुकसानीस MACP प्रकल्प जबाबदार राहणार नाही.
प्रकल्प संचालक
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प
भारतीय कृषि विपणन माहिती व विश्लेषण केंद्र
प्लॉट एफ/इ/७८, पहिला मजला, भूविकास बॅंक इमारत,
मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११ ०३७.
फोन : ०२० २४२७०३१५, वेबसाईट : https://macp.gov.in