द्राक्षाच्या निर्यातीस चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहाय्याने दि. 19 जानेवारी, 1991 रोजी महाग्रेप्स या द्राक्ष उत्पादक सहकारी संस्थांच्या शिखर संस्थेची स्थापना झाली आहे. महाग्रेप्स संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. आजमितीस सांगली, सोलापूर, लातूर, पुणे आणि नाशिक जिल्हयातील 16 द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था या महाग्रेप्सच्या भागीदार झालेल्या आहेत. द्राक्षाच्या निर्यातवाढीसाठी द्राक्ष उत्पादक विभागात प्रि-कुलींग, कोल्ड स्टोअरेज या सारख्या सुविधा उभारणे हे महाग्रेप्सचे प्रमुख कार्य आहे. महाग्रेप्सच्या विशेष प्रयत्नांमुळे महाराष्ट्राची द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारात सुस्थापित झालेली आहे. तसेच गेल्या 10 वर्षात युरोप व मध्यपुर्व बाजारपेठेत महाग्रेप्स हा ब्रँडही सुस्थापित झाला आहे. महाग्रेप्सला निर्यातीस आवश्यक तांत्रिक व आर्थिक सहाय्य कृषि पणन मंडळाने दिले आहे.
निर्यात - 516.53 मे. टन
किंमत - रू. 2.16 कोटी
देश - इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, श्रीलंका
द्राक्षाव्यतिरीक्त महाग्रेप्स डाळींबाचीही निर्यात करते.
सन 2002-2003 कालावधीतील डाळींब निर्यात अहवाल (2003-2004)
निर्यात - 208.06 मे. टन
किंमत - रू. 1 कोटी 17 लाख
महाग्रेप्सची ध्येयधोरणे पुढीलप्रमाणे