आंतरराष्ट्रीय स्तरावर डाळिंब फळास प्राप्त झालेले महत्व आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील डाळिंबाच्या वाढत्या व्यापाराचा विचार करून राज्यातून डाळिंबाच्या निर्यातीमध्ये वृध्दी होण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक ०१/०८/२००५ रोजी महाअनार या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून, सद्यस्थितीत महाअनार चे एकूण 3500 सभासद आहेत. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सहकार्याने महाअनार मार्फत निर्यातयोग्य गुणवत्तेच्या डाळिंब उत्पादनासाठी शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. महाअनार संस्थेने सन 2006-07 मध्ये नेदरलँड येथे एकूण पाच कंटेनरद्वारे डाळिंबाची निर्यात केलेली आहे.